पाकिस्तानला महागाईचा तडाखा, पेट्रोल-डिझेलच्या दरात ११९ रुपयांपर्यंत वाढीचा प्रस्ताव

पाकिस्तानमध्ये सत्ता बदलानंतर आता सर्वसामान्य नागरिकांवर महागाईचा नवा प्रहार झाला आहे.पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली जबरदस्त वाढ पाहून तेथील आर्थिक स्थितीबाबत अंदाज बांधता येत आहे. पाकिस्तानी चलनात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८३.५ रुपये आणि ११९ रुये प्रती लिटरपर्यंत वाढ होऊ शकते.

वस्तूतः, ऑईल इँड गॅस रेग्युलेटरी अॅथॉरिटीने (OGRA) केंद्र सरकारला शनिवारी पेट्रोल ८३.५ रुपये प्रती लिटर आणि डिझेलवर ११९ रुपये प्रती लिटरपर्यंत मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय अर्थ मंत्रालयाकडून पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेतला जाणार आहे.

याबाबत लाइव्ह हिंदूस्थानवर प्रकाशित झालेल्या वृत्तामध्ये एआयवाय न्यूजच्या हवाल्याने म्हटले आहे की प्रस्तावित वाढ जीएसटीच्या ७० टक्के आणि ३० रुपये लेव्हीच्या आधारावर करण्यात आली होती. सद्यस्थितीत पेट्रोल, डिझेलवर लेव्ही ३० रुपये प्रती लिटर आणि १७ टक्के जीएसटी आहे.

OGRAने पूर्ण लेव्ही आणि टॅक्सच्या आधारावर पेट्रोलवर ८३.५ रुपये प्रती लिटर वाढीचा प्रस्ताव दिला. तर डिझेलमध्ये ११९ रुपये प्रती लिटर वाढ करण्याची शिफारस केली आहे. इतर पेट्रोलियम उत्पादनांचा विचार केला तर हलक्या डिझेलसाठी ७७.३१ रुपये, हलक्या डिझेलवर ३८.८९ रुपये पूर्ण टॅक्स दर आणि लेव्हीचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here