सुदान साखर कंपनीकडून ७०० हून अधिक कर्मचार्‍यांच्या बडतर्फीचे पत्र जारी

खार्तूम, सूदान : सुदानमधील केनाना शुगर कंपनीने कोणत्याही कारणाशिवाय कंपनीतील ७०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीचे पत्र जारी केल्याचे वृत्त प्रसार माध्यमांनी दिले आहे. कंपनीचे माजी पर्यवेक्षक जलाल अली अब्दुल्ला यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, बडतर्फीची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे आणि दररोज याबाबतची पत्रे दिली जात आहेत. यामध्ये कंपनीचे सर्व विभाग सहभागी आहेत. कंपनी प्रशासनाशी संबंधीत सुत्रांनुसार बडतर्फ केल्या जाणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या २००० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ही संख्या कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या निम्मी आहे. प्रशासनाने आगामी काही दिवसांत कंपनीचे कुवेत प्रतिनिधी येण्यापूर्वी बरतर्फीची प्रक्रिया पूर्ण करण्याची अपेक्षा ठेवली आहे.

केनाना शुगर कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, कंपनीची स्थापना १९७५ मध्ये अरब जगतासाठी साखर उत्पादन निश्चित करण्यासाठी करण्यात आली होती. ही कंपनी दरवर्षी ४,००,००० टन साखर, ६० मिलियन लिटर इथेनॉल आणि इतर उप पदार्थांचे उत्पादन करते. ही उत्पादने आफ्रिका, मध्य पूर्वेतील देशांसह युरोपला निर्यात केली जातात. कंपनीचे संचालक मंडळाचे अध्यक्ष सुदानचे उद्योग आणि व्यापार मंत्री जिब्रील इब्राहीम आहेत. त्यामध्ये कुवेत आणि सौदी सरकारच्या प्रतिनिधींसह सुदान सेंट्रल बँकेचे गव्हर्नरही सहभागी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here