नवी दिल्ली : पश्चिमेकडील हवामान बदलामुळे जम्मू-काश्मीर आणि आसपासच्या परिसरात एक चक्रीवादळ दिसून आले आहे. एक चक्रवात हवेच्या पूर्वोत्तर उत्तर प्रदेश आमि आसपासच्या परिसरात आहे. विदर्भापासून मराठवाडा आणि कर्नाटकपर्यंत एक टर्फ रेषा पसरल्याचे दिसत आहे. दक्षिण- पूर्ण अरबी समुद्र तसेच लक्षद्विपच्या आसपास चक्रीवाताची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे १९ एप्रिलपर्यंत उत्तर भारतात हवामान बदल गतीने होण्याची अपेक्षा आहे.
स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासात पूर्वोत्तर भारतात हलका ते मध्यम पावसासह काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. दक्षिण कर्नाटक, तामीळनाडू, केरळ आणि लक्षद्विपमध्ये हलका ते मध्यम तसेच काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसला आहे. कर्नाटक तसेच दक्षिण-मध्य महाराष्ट्राच्या उर्वरीत भागात एक अथवा दोन पावसासह हलक्या सरी कोसळल्या आहेत.
हिंदी वेबदुनियावर प्रकाशित वृत्तानुसार, जम्मू-काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका पाऊस झाला आहे. हरियाणा, दिल्ली आणि उत्तर राजस्थानच्या काही भागात छोटी धुळीची वादळे दिसली तर हलका पाऊसही कोसळला. छत्तीसगड, ओडिशाची किनारपट्टी तसेच पश्चिम बंगालमध्ये हलका पाऊस झाला आहे. पश्चिम राजस्थान आणि दिल्लीच्या विविध भागात उष्णतेची लाट दिसून आली आहे. पुढील २४ तासात पंजाब, हरियाणा, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहील. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशात हलका तर पूर्वोत्तर भारत, तामीळनाडू, केरळ, दक्षिण कर्नाटकात हलका ते मध्यम पाऊस कोसळेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.