Godavari Biorefineries कडून IPO आणण्याचा प्रस्ताव

मुंबई : मुंबईस्थित इथेनॉल आणि जैव आधारित रसायन निर्माता गोदावरी बायोरिफायनरीजने (Godavari Biorefineries) आपली Initial public offering (IPO) योग्य वेळी लाँच करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक समीर सोमैया यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, आम्हाला नोव्हेंबरच्या अखेरीस (२०२१) आमच्या आयपीओबाबत सेबीकडून अंतिम प्रस्ताव मिळाला आहे. आमच्याकडे भारतीय शेअर बाजारात नोंदणीबद्ध होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी आहे. आम्ही लिस्टिंग साठी योग्य वेळेची वाट पाहात आहोत.

गेल्या काही महिन्यापासून बदलत्या भौगोलिक राजकीय परिस्थितीकडे निर्देश करताना सोमैया यांनी सांगितले की, आम्ही काय परिस्थिती बदलेल याचा अंदाज घेत आहोत. आणि योग्यवेळी लिस्टिंग करण्याची प्रक्रिया करणार आहोत. ते म्हणाले की, आयपीओमध्ये प्रारंभिक ऑफरमध्ये (primary offering) ३७० कोटी रुपयांचा समावेश असेल. मात्र, पीटीआयच्या म्हणण्यानुसार, IPO चा आकार प्रारंभिक आणि द्वितीय सादरीकरणानंतर सुमारे 700 कोटी रुपयांहून अधिक असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here