नानौता साखर कारखान्यात नव्या मशीनरीमुळे गाळप क्षमता वाढणार : सरव्यवस्थापक ललित कुमार

सहारनपूर : नानौता येथे राज्यातील योगी सरकारच्यावतीने नानौता सहकारी साखर कारखान्यात नवीन मशीनरी बसवून आधुनिकीकरण करण्याच्या घोषणेनंतर या विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खुशीचे वातावरण पसरले आहे. कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक डॉ. ललित कुमार पीसीएस यांनी सांगितले की, यातून साखर कारखान्याला आर्थिक फायदा मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांनाही ऊस बिले वेळेवर देण्यासाठी मदत मिळेल. कारखान्याच्या पॉवर हाऊसमध्ये मशीनरी बदलल्याने वीज पुरवठाही सुरळीत होणार आहे.

याबाबत दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मुख्य व्यवस्थापकांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, जवळपास चार वर्षांपूर्वी पाठवलेल्या आधुनिकीकरणाच्या प्रस्तावा कॅबिनेटने मंजुरी देत जवळपास २० कोटी रुपये खर्चून नवीन मशीन बसविण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे कारखान्यास आर्थिक फायदा होणार आहे. यासोबतच कारखान्यात ऊस गाळप क्षमता वाढविल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल. आधुनिकीकरणात कारखान्याच्या छोट्या ट्रक ट्रीपलरला हटवून मोठे ट्रिपलर बसवले जातील. त्यातून ऊस आणण्याची चांगली सुविधा मिळेल. पॉवर हाऊसमध्ये मशीनरी बदलामुळे वीज पुरवठा नियंत्रणात असेल. कारखान्यातील बॉयलर ट्यूब अपडेट केली जाणार असून बगॅसची बचत होऊन आर्थिक लाभ मिळणार आहे. आगामी गळीत हंगामापूर्वी आधुनिकीकरण पूर्ण करण्याचे प्रयत्न असतील असे मुख्य व्यवस्थापकांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here