हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा
लंडन : चीनी मंडी
आंतरराष्ट्रीय बाजारापेठेत साखरेला पुन्हा चांगले दिवस येऊ लागले आहेत. लंडनच्या बाजारात या आठवड्याच्या सुरुवातीलाच पांढऱ्या प्रक्रियायुक्त साखरेने साडे तीन महिन्यांतील सर्वांत चांगला दर मिळवला आहे. त्यामुळे साखर उद्योगात उत्साहाचे वातावरण आहे. कच्च्या तेलाच्या दरांत झालेली वाढ आणि जगातील सर्वांत मोठा निर्यातदार देश असलेल्या ब्राझीलमधील संभाव्य कोरड्या हवामानाची भीती याचा परिणाम साखरेच्या दरांवर होताना दिसत आहे.
लंडनमध्ये मे व्हाइट शुगरचा दर ३५७.८० डॉलर प्रति टन असा होता. दरात जवळपास ०.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पॅकिंगनंतरचा दर ३५९.४० डॉलर होता. हा दर गेल्या साडे तीन महिन्यांतील सर्वांत चांगला दर आहे.
ब्राझीलच्या दक्षिण मध्य प्रांतात सर्वाधिक ऊस उत्पादन होते. संपूर्ण जानेवारी महिना आणि या महिन्यातील पंधरवडा या दिवसांत दक्षिण मध्य प्रांतात पाऊस झालेला नाही. त्याचा परिणाम साखरेच्या दरांवर दिसत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. बाजारातील विश्लेषक रॉबिन शॉ म्हणाले, ‘ब्राझीलमधील दक्षिण मध्य प्रांतातून यंदा झालेला कमी साखर पुरवठा बाजारपेठेच्या लक्षात आला आहे. अर्थात ही साखर बाजारात फारवेळ राहणार नाही.’ बाजारातील सिद्धांतानुसार जेव्हा साखरेला चांगला दर असेल तेव्हा त्याचा पुरवठा वाढेल. ब्राझीलच्या दक्षिण मध्य प्रांताचा विचार केला तर, साखरेला इथेनॉलपेक्षा चांगला दर मिळाला तर तेथून पुरवठा वाढतो. दुसरीकडे साखरेला चांगला दर मिळाला तर भारतातून निश्चित साखरेची निर्यात वाढते, असे रॉबिन शॉ यांनी सांगितले.
ब्राझीलमधील अनेक साखर कारखाने प्राप्त परिस्थितीनुसार साखर किंवा इथेनॉल काय तयार करायचे? याच निर्णय घेतात, असेही शॉ यांनी स्पष्ट केले.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp