नेपाळ : ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांनी रोखली कारखान्याची साखर वाहतूक

सरलाही : सरलाही येथील शेतकऱ्यांनी ऊसाच्या थकबाकीच्या मागणीसाठी देशात होणारा साखर पुरवठा रोखून धरला आहे. महालक्ष्मी साखर कारखान्याने चालू आर्थिक वर्षात शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या ऊसाची बिले दिलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बुधवारी काठमांडू येथे जाणारे उसाचे तीन ट्रक अडवून आपल्या ताब्यात घेतले.

प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, या कारखान्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या ऊसापोटी १८ कोटी रुपये अद्याप दिलेले नाहीत. याबाबत ट्रकचालक प्रेम बहादूर जारघा यांनी सांगितले की, साखर कारखान्याच्या संचालकांनी ऊस बिले देण्याबाबत कोणतेही स्वारस्य दर्शविलेले नाही. त्यामुळे शनिवारी तीन ट्रक साखरेच्या गोदामात उतरवण्यात आले. जारघा यांनी सांगितले की, आम्ही चार दिवसांपासून येथे अडकून पडलो आहोत. मात्र, हा प्रश्न सोडविण्यासाठी कोणीही स्वारस्य दाखवलेले नाही.

महालक्ष्मी साखर कारखान्याने चालू आर्थिक वर्षात ८,००,००० क्विंटल ऊस गाळप केले आहे. महालक्ष्मी साखर कारखान्याचे संचालक विरेंद्र कनोडिया यांनी सांगितले की, त्यांनी आधीच ऊस बिलांपैकी ९० टक्के बिले अदा केली आहेत. ते म्हणाले की, कारखान्याकडून शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले दिली जात आहेत. काही मध्यस्थ, दलाल स्थानिक शेतकऱ्यांच्या रुपात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप कनोडिया यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here