महाराष्ट्र : ऊस तोडणीसाठी इतर राज्यांतील हार्वेस्टर मागवण्याचा निर्णय

पुणे : नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडने (NFCSF) महाराष्ट्रातील ९० लाख टन ऊस तोडणीसाठी कर्नाटक, गुजरात, तामीळनाडूसह इतर राज्यांतून हार्वेस्टर आणण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील ऊस हंगाम जवळपास संपुष्टात आला आहे. ऊस तोडणी मजूर आपापल्या गावात परतत आहेत. मात्र, अद्याप ९० लाख टन तोडणीविना शेतात उभा आहे. ऊस तोडणी मजुरांच्या टंचाईमुळे NFCSF ने इतर राज्यांतून हार्वेस्टर मागविण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात या हंगामात ऊस आणि साखरेचे उच्चांकी उत्पादन झाले आहे. त्याने प्रतिस्पर्धी उत्तर प्रदेशलाही साखर उत्पादनात पिछाडीवर टाकले आहे. २०२१-२२ या हंगामात महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस गाळप सुरू आहे. आणि उच्चांकी साखर उत्पादन सुरू आहे.

द हिंदू बिझनेस लाइनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार NFCSF चे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी रविवारी साखर उद्योगातील दिग्गजांसोबत बैठक घेतली आणि त्यांना मशीनरी महाराष्ट्रात पाठविण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील तीन जिल्हे जालना, परभणी आणि हिंगोलीमध्ये अतिरिक्त उसाची समस्या आहे. यासोबतच राज्याच्या इतर विभागातही अतिरिक्त ऊस आहे. त्यांनी सांगितले की, इतर राज्यांतील कारखानेही आपापल्या राज्यातील काम पूर्ण करून महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर पाठवतील. यासोबतच महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांतील तोडणी पूर्ण झाली आहे, तेथील हार्वेस्टर आणले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here