अफगाणिस्तानला अनेक देशांकडून साखरेसह इतर खाद्य पदार्थांची मदत

दुबई : अफगाणिस्तानमधील बिघडत्या परिस्थितीमध्ये यूएईने ३९ टन खाद्यपदार्थांचा पुरवठा केला आहे. खाद्यपदार्थ घेऊन UAE चे विमान सोमवारी काबुलमध्ये पोहोचले. तालिबानचे प्रवक्ते जबी उल्लाह मुजाहिद यांनी सांगितले की, सरकारी संस्थांच्या माध्यमातून कमजोर लोकांना मदत वितरीत केली जाईल. मुजाहिद यांनी सांगितले की, आम्ही कोणत्याही राजकीय हेतूशिवाय विनाअट लोकांची मदत करीत आहोत. हा मानवतेचा मुद्दा आहे. अफगाणांना मदत केली पाहिजे. यांदरम्यान, काबुलमध्ये तुर्कीचे राजदूत सिहाद एर्गिन यांनी सांगितले की, तुर्कस्थानकडून मदतीचे चौथे पॅकेज हेरात प्रांतातील तोरघोंडी बंदरात पोहोचले आहे. एर्गिन यांनी सांगितले की, या मदतीमध्ये गहू, औषधे, साखर आणि इतर साहित्याचा समावेश आहे.

तालिबानने मदतीचे पारदर्शक वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच सरकारी संस्थांच्या माध्यमातून मदतीचे वितरण केले जाईल. यामध्ये पारदर्शकता असेल आणि आम्ही साहित्याचे योग्य वितरण करू. मुजाहिद यांनी सांगितले की, दुर्दैवाने, आंतरराष्ट्रीय संघटनांकडून वितरीत केलेल्या साहित्याबाबत समस्या आहेत. अफगाणीस्तानातील मानवी स्थितीवर प्रकाश टाकताना, संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटले होते की, संकटग्रस्त देशात नऊ मिलियन लोकांना धोका आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अफगाण सरकार कोसळल्यानंतर आणि तालीबान परत सत्तेवर आल्यानंतर अफगाणीस्तानमध्ये मानवाधिकारांची स्थिती खराब झाली आहे. देशात आताही मानवाधिकाराच्या उल्लंघनाचे गंभीर प्रकार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here