बांगलादेश : तीन साखर कारखान्यांच्या खासगीकरणाचा सरकारचा विचार

ढाका : बांगलादेशातील साखर उद्योग गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात सुरू आहे. त्यामध्ये तीन साखर कारखान्यांवर राज्याच्या मालकीचे वाणिज्य आणि विशेष बँकांची ७,७०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. तोट्याबाबत निर्देश करत सार्वजनिक ज्यूट कारखान्यांना खासगी क्षेत्राच्या हवाली करण्यात आल्यानंतर आता सरकार राज्याच्या मालकीच्या साखर कारखान्यांच्या खासगीकरणाचा विचार करत आहे. मोठ्या प्रमाणावर तोटा आणि कर्जामुळे निराश झालेल्या सरकारने राज्याच्या मालकीच्या तीन साखर कारखान्यांना परदेशी कंपन्यांच्या ताब्यात सोपविण्याची तयारी सुरू केली आहे.

दि शुगर इंटरनॅशनल कंपनी – जपान, थायलंड आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) हा तीन कंपन्यांचा संयुक्त संघ आहे. तिन्ही कारखान्यांमध्ये त्यांनी जवळपास Tk5,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील शरकारा इंटरनॅशनलच्या नेतृत्वाखाली संघाने सेताबगंज, मोबारकगंज आणि राजशाही साखर कारखाना सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. बांगलादेश शुगर अँड फूट इंडस्ट्रिज कॉर्पोरेशनचे (हीएसएफआयसी) अध्यक्ष मोहम्मद अरिफुर रहमान अपू यांनी सांगितले की, शरकारा इंटरनॅशनलची तीन कारखान्यांच्या निविदेबाबत सादरीकरणावर चर्चा झाली आहे. मात्र, कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. या मुद्यावर अंतिम चर्चेसाठी आणखी एक बैठक होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here