नितिन गडकरी यांनी घेतली ब्राझीलच्या ऊर्जामंत्र्यांची भेट, इथेनॉल वापरातून दोन्ही अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे आवाहन

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी दिल्लीत ब्राझीलचे ऊर्जा मंत्री बेंटो अल्बुकर्क (Bento Albuquerque) याची भेट घेतली. दोन्ही देशांची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी इथेनॉलचा वापर आणि विविध क्षेत्रात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अधिक सहयोग देण्यावर त्यांनी भर दिला. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी यांनी ब्राझीलच्या खाण आणि ऊर्ज मंत्री बेंटो अल्बुकर्क यांच्या नेतृत्वाखालील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत भेट घेतली. यामध्ये भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाच्या प्रतिनिधींसह साखर, इथेनॉल आणि ऑटोमोबाईल उद्योगांतील ब्राझीलमधील प्रतिनिधी सहभागी होते.

नीती आयोगाचे सीएई अमिताभ कांत यांनी ब्राझीलचे ऊर्जामंत्री बेंटो अल्बुकर्क यांची भेट घेतली.. दोन्ही देशांनी ऊर्जा क्षेत्रात ब्राझील आणि भारताचे सहकार्य मजबूत करण्याच्या संधींवर चर्चा केली. यापूर्वी २० मार्च रोजी गडकरी यांनी साखर उत्पाकांना साखर कमी करणे आणि साखर इथेनॉलमध्ये रुपांतरीत करण्यास आग्रह केला होते. हा बदल देशाच्या गरजांनुसार आहे.

मुंबईत मंत्री गडकरी यांनी साखर आणि आनुषांगिक उद्योगांचे बातमी व माहिती पोर्टल चीनीमंडीकडून आयोजित शुगर अँड इथेनॉल इंडिया कनॉन्फरन्स २०२२ मध्ये बोलताना सांगितले की, साखर उत्पादन कमी करणे हे आपल्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तांदूळ, मक्का आणि साखरेच्या अतिरिक्त उत्पादनापासून सुटका करून घेण्यासाठी इथेनॉल उत्पादन वाढविण्याची गरज आहे. जर साखरेचे उत्पादन अशाच पद्धतीने वाढले तर आगामी काळात साखर उद्योगासाठी ते हानीकारक असेल.

मंत्री गडकरी यांनी सांगितले की, भारत सरकारने नागरिकांसाठी इथेनॉल भरण्यासाठी जैव इंधन आऊटलेट उघडण्याचा निर्णय घेतला आहे. फ्लेक्स इंजिनवर कार, स्कूटर, मोटारसायकल, रिक्षा उपलब्ध धावू शकते. त्यांनी इथेनॉल निर्मितीसोबत साखर कारखान्यांना आपल्या कारखाना तसेच इतर क्षेत्रात इथेनॉल पंप सुरू करण्यास सांगितले. तेथे १०० टक्के इथेनॉलवर चालणारे स्कूटर, ऑटो रिक्षा, कार येऊ शकतात. त्यातून इथेनॉलचा खप वाढू शकतो. यातून प्रदूषण कमी होईल. इंधन आयात कमी होऊ शकते. गावातील लोकांना त्यातून रोजगार मिळेल.

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, इथेनॉल हे स्वच्छ इंधन आहे. सध्या आम्ही ४६५ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन करीत आहोत. जेव्हा ई २० कार्यक्रम पूर्ण होईल, तेव्हा आपली गरज १५०० कोटी लिटरची असेल. याशिवाय जेव्हा आगामी पाच वर्षात फ्लेक्स इंजिन तयार होतील, तेव्हा इथेनॉलची मागणी ४००० कोटी लिटरवर पोहोचेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here