नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. तेलाच्या किमतीत आज कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर बनले आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल १०५.४१ रुपये आणि डिझेल ९६.६७ रुपये दराने मिळत आहे. IOCL ने अपडेट केलेल्या दरानुसार देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोल १२०.५१ रुपये आणि डिझेल १०४.७७ रुपये दराने मिळत आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल ११५.१२ रुपये आणि डिझेल ९९.८३ रुपये दराने विक्री होत आहे. चेन्नईत पेट्रोल ११०.८५ रुपये आणि डिझेल १००.९४ रुपयांना मिळत आहे. २२ मार्चपासून पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. सहा एप्रिलपर्यंत ही दरवाढ झाली. त्यानंतर दर स्थिर आहेत. यूपी, मध्य प्रदेशात पेट्रोल, डिझेलचे दर वेगवेगळे आहेत. युपीची राजधानी लखनौमध्ये पेट्रोल १०५.२५ रुपये आणि डिझेल ९६.८३ रुपये दराने मिळत आहे. नोएडात पेट्रोल १०५.४७ रुपये तर डिझेल ९७.०३ रुपये प्रती लिटर आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ११८.१४ रुपये दराने पेट्रोल आणि डिझेल १०१.१६ रुपये दराने मिळत आहे.
विविध राज्यांत व्हॅट आकारणी भिन्न आहे. पेट्रोल-डिझेलचा दर तुम्ही SMS च्या माध्यमातूनही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP लिहून शहराच्या कोड नंबरसह ९२२४९९२२४९ या क्रमांकावर मेसेज पाठवून दराची माहिती घेऊ शकतात. पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलत असतात. सकाळी सहा वाजता हे दर बदलले जातात.