पंतप्रधन शाहबाज शरीफ यांच्या निर्देशानंतर पाकिस्तानातील पंजाब प्रांतात साखर दरात घट

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निर्देशानंतर देशातील सर्वाधिक लोकसंख्येच्या पंजाब प्रांतात पीठ आणि साखरेच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. बुधवारी सूचना आणि प्रसारण मंत्री मरियम औरंगजेब यांनी याबाबत घोषणा केली. मंत्रिमंडळाने साखर आणि पीठाच्या किमती कमी करण्यात अंतिम मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले. डेली पाकिस्तानने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने पंजाबमध्ये ईद पर्यंत १० किलो पीठाची पिशवीची किंमत ५५५० रुपये आणि साखरेची किंमत ७५ रुपयांवरून कमी करून ७० रुपये प्रती किलो करण्यात आली आहे.अर्थ मंत्री मिफ्ताह इस्माल यांच्यासोबत मौजुद औरंगजेब यांनी सांगितले की, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मरियम यांनी सांगितले की, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. इम्रान खान यांच्या शासन काळात पाकिस्तान सरकारने देशात साखरेच्या दरवाढीच्या संकटामध्ये साखरेचा पूर्ण साठा बाजारात विक्री करण्याचा निर्णय घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here