फ्लेक्स-फ्युएल बाईक: पेट्रोल आणि इथेनॉलवर चालणार Hondaच्या बाईक्स

नवी दिल्ली : होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने फ्लेक्स – फ्यूएल कम्प्युटर मोटारसायकलवर काम सुरू असल्याचे आणि लवकरच देशात त्याचे लाँचिंग केले जाणार असल्याचे म्हटले आहे. कंपनी भारतात फ्लेक्स – फ्युएल इंजिन असलेली एक अथवा अधिक कम्प्युटर बाईक लाँच करणार आहे. ही बाईक पेट्रोल आणि इथेनॉलवर धावेल. HMSI ने सांगितले की, त्यांच्याकडून भारतात अनेक इलेक्ट्रिक टू व्हीलर्सही लाँच केली जाणार आहेत. एकदा बाईक लाँचिंग झाल्यानंतर ही कंपनी भारतात टीव्हीएस मोटार कंपनीनंतर फ्लेक्स-फ्यूएल इंजिनवर चालणारी मोटारयाकल लाँच करणारा दुसरा ब्रँड बनेल. यापूर्वी टीव्हीएसने Apache RTR 200 Fi E100 सोबत फ्लेक्स – फ्यूएल इंजिन लाँच केले आहे.

होंडाने ब्राझीलमध्ये फ्लेक्स-फ्लूएल मोटारसायकल CG150 TITAN MIX विक्री केली जाते. होंडा ही भारतातील दुसरी सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी फ्लेक्स-फ्यूएल इंजीन सर्व वाहन निर्मात्यांना अनिवार्य करण्याबाबत याआधीच घोषणा केली आहे. होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाचे एमडी आणि प्रेसिडेंट, सीईओ Atsushi Ogata यांनी सांगितले की, होंडाने एचएमएसआय भारतात विस्तार करण्याचे ठरवले आहे. भविष्यात फ्लेक्स-फ्यूएल टेक्नॉलॉजी मोठी ताकद बनणार आहे. कंपनी ईव्हीवरही काम करीत आहे. होंडाने यापू्र्वी २००९ मध्ये ब्राझीलमध्ये अशी बाईक लाँच केली होती. तेथे Honda CG150 Titan Mix ही पहिली फ्लेक्स-फ्युएल मोटारसायकल होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here