मुरादाबाद : पश्चिम उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्याची ओळख पितळेची नगरी अशी आहे. आता ऊस शेतीनंतर हा जिल्हा ऊसाचे आगर म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील बिलारी तालुक्यात राहणाऱ्या एका शेतकऱ्याने टंच टेक्निकद्वारे २३ फूट उंच उसाचे पिक घेतले आहेमुरादाबाद विभागातील या शेतकऱ्याचा ऊस पाहण्यासाठी लांबवरून शेतकरी येत आहेत. शेतकरी मोहम्मद मुबीन यांच्याकडून शेतकरी हा ऊस पिकवण्याची पद्धती जाणून घेत आहेत.
याहाहत टीव्ही ९ हिंदी डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, मुरादाबादमधील शेतकऱ्यांडून टंच टेक्निकची माहिती दिली जात आहे. बिलारी विभागातील या शेतकऱ्याने या नव्या तंत्राचा केलेला वापर जिल्ह्यात चर्चेचा ठरला आहे. बिलारीतील थालावा येथे राहणाऱ्या मोहम्मद मोबिन यांनी आपल्या शेतात नेहमीच्या ४०-५० क्विंटल उसाऐवजी १०० क्विंटलहून अधिक उत्पादन घेतले आहे. शेतकऱ्यांना या तंत्राचा वापर केल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. पहिल्यांदा जेव्हा मोबिन यांनी या पद्धतीने पिक घेतले, तेव्हा त्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र नंतर त्यांनी त्यातून मार्ग काढला. आता ते इतर शेतकऱ्यांनाही नव्या तंत्राचा वापर करावा असे आवाहन करीत आहेत.