उत्तर प्रदेशातील गळीत हंगाम २०२१-२२ समाप्तीच्या दिशेने जात आहे. आणि साखर उतपादनात घट दिसून आली आहे. मात्र, ऊस बिले देण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे साखर कारखाने वेळेवर बिले देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, २६ एप्रिल २०२२ पर्यंत राज्यांत साखर कारखान्यांनी ९६४.५७ लाख टन उसाचे गाळप करुन ९७.६८ लाख टन साखर उत्पादित केली आहे. तर ऊस बिलांच्या बाबत आतापर्यंत २२,९५७.५० कोटी रुपये म्हणजे ७२.२५ टक्के बिले देण्यात आली आहेत. गेल्या हंगामात राज्यात १०२७.५० लाख टन ऊस गाळप करुन ११०.५९ लाख टन साखर उत्पादन करण्यात आले होते.
देशात यावर्षीच्या हंगामात उच्चांकी साखर उत्पादन आणि निर्यात झाली आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्रात वाढ दिसून आली आहे.