सीएनजी, पेट्रोल-डिझेल नंतर आता मारुती कंपनी आणखी एका इंधनावरील हायब्रिड कार बाजारात लाँच करणार आहे. इथेनॉलवर चालणारे ई २० वाहन पुढील वर्षापर्यंत बाजारात आणणार आहे. हे ई २० वाहन पेट्रोल आणि इथेनॉलवर चालेल. भविष्यात सर्व कारमध्ये असे कंफर्टेबल इंजिन असेल, त्याची ट्यूनिंग इथेनॉल फ्यूएलच्या वाहनासोबत करता येईल असा दावा कंपनीने केला आहे. या ई २० वाहनांची किंमत इतर वाहनांच्या तुलनेत थोडी जास्त असेल.
याबाबत टीव्ही९हिंदी डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, मारुती कंपनी पेट्रोल-सीएनजी आणि फ्लेक्स फ्यूएलच्या ऑप्शनसह इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांवर काम करीत आहे. कारदेखो डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार कंपनीने अलीकडे एका मुलाखतीत सांगितले आहे की ई २० वर चालणाऱ्या वाहनांवर सध्या काम केले जात आहे. कंपनीचा दावा आहे की, एप्रिल २०२३ पर्यंत ई २० वाहन रस्त्यावर येईल. ई २० वाहन म्हणजे यामध्ये २० टक्के इथेनॉल आणि ८० टक्के पेट्रोल असेल. पेट्रोल, सीएनजी शिवाय हा तिसरा इंधनाचा ऑप्शन लोकांसमोर असेल. हे फ्लेक्स फ्यूएल इंजिन एकतर एकाच अथवा मिश्र इंधनावर काम करेल. सध्याच्या इंजिनमधील सेटिंगसोबत ५ ते १० टक्के इथेनॉल मिश्रण चालते. कंपनीने सांगितले की, ई २० इंजिनवर चालणारी वाहने इतर तुलनेत जास्त किमतीची असतील. केंद्र सरकार २०२५ पर्यंत ई २० इथेनॉल ब्लेंडिंगचे उद्दिष्ट पूर्ण करणार आहे. वाहन उद्योगात मारुती ही एकमेव कंपनी ई २० फ्यूएलवर सध्या काम करीत आहे.