मराठवाड्यातील ऊस उत्पादकांना कोल्हापूरहून मिळणार मदत

कोल्हापूर : कोल्हापूरमधील ऊस हार्वेस्टर चालकांनी आपली हार्वेस्टर यंत्रणा मराठवाड्यातील शेतांमध्ये ऊभ्या ऊस पिक तोडणीसाठी पाठविण्यास सहमती दर्शविल्याचे वृत्त प्रसार माध्यमांनी दिले आहे. कोल्हापूर विभागातील ऊस हंगाम समाप्त झाला आहे. मात्र, मराठवाडा विभागातील ऊस तोडणी अद्याप शिल्लक आहे. प्राथमिक अनुमानानुसार, मराठवाड्यात अद्याप ६० लाख टन ऊस शेतामध्येच शिल्लक आहे. तेथे तोडणी मजुरांच्या कमतरतेमुळे कारखान्यांना ऊस तोडणी शक्य झालेली नाही.

द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, रविवारी नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरिजचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील हार्वेस्टर मशीन मालकांना आपली सेवा देण्याचे आवाहन केले. या बैठकीत बिलांबाबत हार्वेस्टर मालकांनी चिंता व्यक्त केली. कामानंतर १५ दिवसांत पैसे मिळावेत अशी मागणी त्यांनी केली. याबाबत साखर आयुक्त कार्यालय मराठवाड्यातील कारखानदारांकडून वेळेवर पैसे मिळवून देण्यास मदत करेल असे आश्वासन दांडेगावकर यांनी हार्वेस्टर चालकांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here