मुंबई : गौतम अदानी यांची कंपनी अदानी विल्मरने नवा उच्चांक निर्माण केला आहे. खाद्यतेल बनविणाऱ्या या कंपनीने तीन महिन्यात मार्केट कॅपिटल १ लाख कोटी रुपयांवर नेले आहे. अदानी विल्मरचे शएअर आज ५ टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करीत ट्रेड करीत होते. कंपनीचे शेअर ८०० रुपयांवर पोहोचले आहेत. त्यानुसार अदानी विल्मरचे मार्केट कॅपिटल १.०४ कोटी रुपय झाले आहे. या तेजीसोबत अदानी विल्मर जगातील टॉप ५० कंपन्यांच्या यादीत आली आहे. सोमवारी कंपनीचे शेअर ७६४.६० रुपयांवर क्लोज झाले होते.
एका आठवड्यात अदानी ग्रुपच्या या दुसऱ्या कंपनीने नवा विक्रम नोंदवला आहे. गेल्या आठवड्यात अदानी पॉवर कंपनीने १ लाख कोटी रुपयांचे मूल्यांकन पार केले होते. आता अदानी पॉवरचे मार्केट कॅपीटल १.१० लाख कोटी रुपये आहे. अदानी विल्मरच्या शेअरची किंमत ३४ रुपयांनी वाढून ८०३.१५ रुपयांच्या लाइफ टाइम हायवर आहे. कंपनी शेअरनी लिस्टिंग डेनंतर २६३ टक्के रिटर्न दिले आहेत. या शेअरचे लिस्टिंग ८ फेब्रुवारी २०२२ रोजी झाली होती. कंपनीचा इश्यू प्राइज २१८-२३० रुपये होता. हा शेअर डिस्काऊंटवर २२१ रुपयांना लाँच झाला होता. इंडोनेशियाकडून २८ एप्रिलपासून पाम तेलाच्या निर्यातीवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे जागतिक स्थिती बदलली आहे. अदानी विल्मर खाद्यतेलाच्या क्षेत्रात बडी कंपनी असल्याने शेअरचे दर वधारले आहेत.