उत्तर प्रदेश : मुजफ्फरनगरमध्ये ऊस पिकावर टॉप बोरर किडीचा फैलाव

मेरठ : तहसील क्षेत्रात ऊस पिकावर टॉप बोरर रोगाचा फैलाव झाला आहे. दररोज या रोगाचा फैलाव वाढतच चालल्याचे दिसून येत आहे. विभागातील शेतकऱ्यांनी सांगितले की, बाजारात या रोगावर फार औषधे, किटकनाशके उपलब्ध नाहीत. शेतकरी आपल्या ज्ञानानुसार रोगावरील औषधे फवारत आहेत. मात्र, कोणताही परिणाम होताना दिसून येत नाही. शेतकऱ्यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षात बाजारात याबाबत बनावट औषधांची संख्या जास्त आहे. मात्र, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. अशीच स्थिती राहीली तर शेतकऱ्यांचे खूप नुकसान होईल.

ऊस पिकावर टॉप बोरर रोगाचा फैलाव झाला आहे. या रोगामुळे शेतकर्‍यांची झोप उडाली आहे. ज्यामुळे वेगाने ऊसाची रोपे सुकत चालली आहेत. लवकर यावर काही उपाययोजना केली गेली नाही तर ऊस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांच्या या गंभीर समस्येवर कृषी विभागाचे अधिकारी मौन बाळगून आहेत, असे फुगाणा येथील मुकेश मलिक यांनी सांगितले. ऊसाच्या लावण आणि खोडवा पिकावर टॉप बोरर किडीने हल्ला केला आहे. त्यामुळे उसाची रोपे सकत चालली आहेत. बाजारातील कोणत्याच औषधाचा यावर उपयोग होत नाही. जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे रामनिवास सहरावत म्हणाले. तर बाजारातील कोणत्याच औषधाचा यावर परिणाम होत नसल्याचे माजी सरपंच चौ. थाम सिंह यांनी सांगितले. शेतकरी या रोगाने उद्ध्वस्त होत असल्याचे जौलाचे सरपंच हाजी जमशेद म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here