न्यूयार्क : अमेरिकेतील आठ मिडवेस्ट राज्यांच्या राज्यपालांनी बायडेन प्रशासनाकडे वर्षभर उच्च इथेनॉल मिश्रित गॅसोलीनची विक्री करण्यास परवानगी देण्यासाठी नियम लागू करण्याची मागणी केली आहे. आयोवा, इलिनोइस आणि मिनेसोटा येथील गव्हर्नरनी पर्यावरण संरक्षण एजन्सींना लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे की, इथेनॉल मिश्रणाला ई १५ च्या रुपात ओळखले जात आहे. याला वर्षभर विक्री करण्याची अनुमती दिल्यास गॅसोलीनच्या किमती कमी करण्यास मदत मिळेल. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर या किमती ४ डॉलर प्रती बॅरलपेक्षा अधिक झाल्या आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी ई १५ उन्हाळ्याच्या कालावधीत विक्रीस मंजुरी देण्याच्या योजनेची घोषणा केली होती. यामध्ये १५ टक्के इथेनॉल मिश्रणाचा वापर केला जातो. ई १५ मिश्रणावर उन्हाळ्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कारण ते उन्हाळ्याच्या काळात धुकट वातावरणाची निर्मिती करण्यास मदत करते. मात्र, संशोधनात असे आढळून आले आहे की, १५ टक्के मिश्रण वर्षभर विक्री केल्यानंतरही नियमित ई १० च्या तुलनेत त्यातून फारसे धुकट वातावरण पसरत नाही. मिश्रणाची विस्तारीत विक्री झाल्यास मक्क्यावर आधारित इथेनॉलची मागणी वाढण्याची शक्यता आहे.