ऑटोमोबाइल उद्योगाने इथेनॉल, ग्रीन हायड्रोजन, इतर जैव इंधन पर्याय स्वीकारण्याचे नितिन गडकरी यांचे आवाहन

हैदराबाद : ऑटोमोबाईल उद्योगामध्ये इथेनॉल, मिथेनॉल, ग्रीन हायड्रोजन आणि इतर जैव इंधनाच्या पर्यायांचे वैविध्यिकरण करणे हे आपले परिवहन मंत्री म्हणून स्वप्न असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

FICCI Ladies Organisation (FLO) द्वारे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, की, आज ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की त्याबाबत मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. तुम्ही पुढील ५० वर्षांचा विचार करावा असे मला वाटते. सद्यस्थितीत आपल्याकडे पेट्रोल, डिझेलवर चालणारऱ्या मोटारी आहेत. परिवहन मंत्री म्हणून माझे स्वप्न आहे की इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायो सीएनजी, ग्रीन हायड्रोजन असे वैविध्यिकरण ऑटोमोबाईल उद्योगात झाले पाहिजे. जगाला हरित हायड्रोजन निर्यात करणे हे आमचे स्वप्न आहे.

सद्यस्थितीत भारताकडून फ्लेक्स फ्युएल वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. अनेक कंपन्या यामध्ये आपले सारस्य दर्शवित आहेत. अलिकडेच भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने एप्रिल २०२३ पर्यंत ई २० मिश्रणावरील कार बाजारात आणण्याची घोषणा केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here