गोरखपूर : ऊस पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी किडींपासून बचाव आणि औषधांचा वापर यासाठी उत्तर प्रदेश साखर आणि ऊस विकास महामंडळाचे बस्ती जिल्ह्यातील मुंडेरवा युनिट शेतकऱ्यांमध्ये जागरुकता अभियान चालवत आहे. यासाठी एलएसएसच्या कर्मचाऱ्यांकडून तांत्रिक माहिती देण्यासह अनुदनावर किटकनाशकाची उपलब्धता करुन देण्यात आली आहे. एलएसएसचे ऊस विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. व्ही. के. द्विवेदी यांनी सांगितले की, ऊस पिकावरील टॉप बोरर किडींच्या प्रकोप अधिक दिसून येत आहे. यामध्ये किडीमुळे पानांना छिद्रे पडतात. अशी मृत रोपे काढून टाकावीत. रोगग्रस्त पिकावर कोराजन १५० मिली ४०० मिलि पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी.
याबाबत दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृ्त्तानुसार, या किडीमुळे पाने पिवळी पडतात. अशा ठिकाणी इमिडाक्लोप्रिड १७.८ ईसीची फवारणी करावी. किडीमुळे उसाच्या खोडव्याचे अधिक नुकसान होते. अस्टलिगो सिटामिनीअर किडीपासून होणाऱ्या रोगात उसाचे फुटवे की होतात. ऊस अतिशय पातळ तयार होतो. अशा स्थितीत उसावर प्रोपिकोनाजोल २५ ईसीची फवारणी करावी. पायरीलाच्या प्रकापोदरम्यान, किडीमुळे पानांतील रस कमी होतो. बचावासाठी इमिडा क्लोरोपिड औषध २५० एमएल प्रती एकर २५० ते ३०० लिटर पाण्यास मिसळून फवारावे.