बिहारमध्ये इथेनॉल धोरणांतर्गत ३०,३२२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव

नवी दिल्ली : गेल्या एका वर्षात औद्योगिक युनिट स्थापनेसाठी राज्याचत ३६,२५३ कोटी रुपयांचे प्रस्ताव मिळाले आहेत, अशी माहिती बिहारचे उद्योगमंत्री सैयद शाहनवाज हुसेन यांनी दिली. ते म्हणाले, गेल्या वर्षी घोषणा केलेल्या बिहार इथेनॉल प्रॉडक्शन प्रमोशन पॉलिसी २०२१ यशस्वी झाली आहे. आणि ३०,३२२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव इथेनॉल धोरणांतर्गत मिळाले आहेत.

बिहारला पूर्व भारताच्या प्रमुख गुंतवणूक स्थळामध्ये समाविष्ट करण्यासाठी आयोजित इन्व्हेस्टर्स मीटबाबत विस्तृत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हुसेन म्हणाले की, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार पुढे जाण्यासाठी गतीने पावले उचलत आहे. बिहार देशातील इथेनॉल हब बनण्याची तयारी करत आहे. पहिल्या टप्प्यात बिहारच्या विविध विभागात १७ इथेनॉल युनिट स्थापन केली जात आहेत. ते म्हणाले, इथेनॉल धोरण २०२१ च्या प्रारंभानंतर देशातील पहिल्या ग्रीनफिल्ड धान्यावर आधारित इथेनॉल युनिटचे उद्घाटन पुर्णियामध्ये ३० एप्रिल रोजी करण्यात आले होते.

नवी दिल्ली : गेल्या एका वर्षात औद्योगिक युनिट स्थापनेसाठी राज्याचत ३६,२५३ कोटी रुपयांचे प्रस्ताव मिळाले आहेत, अशी माहिती बिहारचे उद्योगमंत्री सैयद शाहनवाज हुसेन यांनी दिली. ते म्हणाले, गेल्या वर्षी घोषणा केलेल्या बिहार इथेनॉल प्रॉडक्शन प्रमोशन पॉलिसी २०२१ यशस्वी झाली आहे. आणि ३०,३८२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव इथेनॉल धोरणांतर्गत मिळाले आहेत.

बिहारला पूर्व भारताच्या प्रमुख गुंतवणूक स्थळामध्ये समाविष्ट करण्यासाठी आयोजित इन्व्हेस्टर्स मीटबाबत विस्तृत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हुसेन म्हणाले की, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार पुढे जाण्यासाठी गतीने पावले उचलत आहे. बिहार देशातील इथेनॉल हब बनण्याची तयारी करत आहे. पहिल्या टप्प्यात बिहारच्या विविध विभागात १७ इथेनॉल युनिट स्थापन केली जात आहेत. ते म्हणाले, इथेनॉल धोरण २०२१ च्या प्रारंभानंतर देशातील पहिल्या ग्रीनफिल्ड धान्यावर आधारित इथेनॉल युनिटचे उद्घाटन पुर्णियामध्ये ३० एप्रिल रोजी करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here