पुरेसा ऊस न मिळाल्याने साखर कारखाना संकटात, उसासाठी एमडी शेतकऱ्यांच्या भेटीला

पानीपत : डाहर गावातील नव्या साखर कारखान्यासमोर ऊस टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे कारखान्याचे कार्यकारी संचालक नवदीप सिंह आपल्या स्टाफसह फिल्डवर उतरले आहेत. त्यांनी हथवाला, राक्सेडा, यमुनालगतच्या शेतकऱ्यांना आपला ऊस लवकरात लवकर कारखान्याला पाठविण्याचे आवाहन केले. ज्यांना तोडणी पावती मिळाली नसेल, अशा शेतकऱ्यांनीही ऊस पाठवावा. त्यांना करखान्यात पावती देऊ असे त्यांनी सांगितले. कारखान्याची प्रती दिन गाळप क्षमता ५० हजार क्विंटल आहे तर दररोज २० ते २२ हजार क्विंटल ऊस मिळत आहे. कमी उसाअभावी कारखान्याचे नुकसान होत आहे.

याबाबत दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखान्याचे कार्यकारी संचालक नवदीप सिंह यांनी सांगितले की, दर अशीच स्थिती राहील तर नवा कारखाना बंद करून जुना सुरु करावा लागेल. एक मे रोजी मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी नव्या साखर कारखान्याची भेट शेतकऱ्यांना दिली होती. वीस दिवसांपूर्वी एमडींची सोनीपतमधील शेतकऱ्यांनी भेट घेतली होती. तेव्हा ऊस घेण्याची मागणी होती. आता सोनीपत, रोहतक, असंधमधील शेतकरी ऊस घेऊन आले नाहाती. पूर्वी ३० ते ४० हजार क्विंटल ऊस गाळपास येत होता. आता आवक घटून निम्म्यावर आली आहे. तोडणी कामगार ईदसाठी गावांकडे परतल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here