ओडिशा सरकारची इथेनॉल प्लांट स्थापनेला मंजुरी

भुवनेश्वर : ओडिशाचे मुख्य सचिव सुरेश चंद्र महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय सिंगल विंडो क्लिअरन्स अथॉरिटीच्या (SLSWCA/State Level Single Window Clearance Authority) १०९ व्या बैठकीत ४९३.६२ कोटी रुपयांच्या सहा औद्योगिक विकास योजनांना मंजुरी देण्यात आली. यामधून एकूण १३१७ हून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या सहा औद्योगिक योजनांमध्ये एका इथेनॉल प्लांटचाही समावेश आहे.
SLSWCA ने Sonepur मध्ये जेआरएस व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे २.५ मेगावॅट को-जनरेशन विज प्रकल्प स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. यासोबत १०० केएलपीडी इथेनॉल प्लांट स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी १२१ कोटी रुपये खर्च येणार आहे. आणि हा प्लांट ११४ हून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देईल असे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here