सर्वसामान्य जनतेला महागाईचा तडाखा, घरगुती गॅस सिलिंडर महागला

मुंबई : देशातील सर्व नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा तडाखा बसला आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या (१४.२ किलो) किमतीत ५० रुपयांची वाढ झाली आहे. इंधन वितरण कंपन्यांनी शनिवारी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केली. या दरवाढीनंतर दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडर ९९९.५० रुपये झाला आहे. मार्च २०२२ मध्ये सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. तर गेल्या आठवड्यात व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत १०२ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर हा सिलिंडर २२५३ रुपयांना विक्री केला जात आहे.

याबाबत इंडिया डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, सर्वसामान्य जनता आधीच पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने मेटाकुटीला आली असताना आता यामध्ये गॅस सिलिंडरच्या दरवाढीची भर पडली आहे. त्यामुळे खिशाला चाट बसणार आहे. एक मे रोजी १९ किलोच्या व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत १०२.५० रुपये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर याची किंमत २३५५.५० रुपये झाली आहे. तर ५ किलोचा एलपीजी गॅस सिलिंडरचा दर ६५५ रुपये झाला आहे.

यापूर्वी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात २५० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर एक एप्रिलपासून हा सिलिंडर २२५३ रुपये झाला होता. एक मार्च रोजी हे दर आणखी १०५ रुपयांची वाढले. त्यामुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here