बिहार : पूर्णियामध्ये इथेनॉल प्लांटनंतर साखर कारखान्याची मागणी, १६ वर्षांपासून आहे प्रतीक्षा

मधेपुरा : उदाकिशुनगंजमध्ये साखर कारखाना नसल्याबाबत आता सगळ्यांना दुःख वाटत आहे. लोकांना विकासाची चिंता भेडसावत आहे. साखर कारखाना कसा सुरू होईल यावर विचारमंथन सुरू झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते वसंत झा आणि माजी जि. प. सदस्य अमलेश राय यांनी यासाठी संघर्ष समिती स्थापन करण्यात येईल असे सांगितले. यामध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश असेल. लवकरच याची घोषणा केली जाईल. समिती कालबद्ध आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न करील. त्यातून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न असतील.

याबाबत दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, राज्य सरकारने १६ वर्षांपूर्वी उदाकिशुनगंजमध्ये साखर कारखाना सुरू करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर ३० जुलै २००६ रोजी राज्य सरकारचे मंत्री व आमदारांनी उत्तर प्रदेशातील धामपूर साखर कारखान्याचे मालक विजय गोयल यांना घेऊन उदाकिशुनगंजला भेट दिली होती. येथे ऊस शेतीची पाहणी, सर्व्हे करण्यात आला. त्यानंतर साखर कारखान्यासाठी भूमी अधिग्रहणास सुरुवात झाली. कारखान्यासाठी उदाकिशुनगंजमध्ये मधुबन तीनटेंगा आणि बिहारीगंजच्या गमैल मोजा येथील जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले होते. कारखान्यासाठी साडेतीनशे एकरपैकी २८० एकर जमीन अधिग्रहीत करण्यात आली. बिहारगंजमध्ये कार्यालयही सुरू करण्यात आले होते. मात्र, काही दिवसानंतर हा प्रकल्प बारगळला. कारखाना सुरू झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांसह हजारो लोकांच्या हाताला काम मिळू शकते असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here