यह न्यूज़ सुनने के लिए इमेज के निचे के बटन को दबाये
फरिहा (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी
शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करण्यासाठी फरिहा येथे एक ऊस केंद्र सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी म्हणून सुरू केलेल्या या केंद्रावर गेल्या १५ ते २० दिवसांत उसाची खरेदी करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाचे वजनच झालेले नाही. त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी संतप्त झाले आहेत. या संदर्भात तक्रार करूनही शेतकऱ्यांची कोणत्याही पातळीवर दखल घेण्यात आलेली नाही.
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फरिहामधील ऊस केंद्रावर गेल्या १५ ते २० दिवसांत ऊस खरेदीच बंद करण्यात आलेली आहे. या केंद्रावर उसाचे वजन केले तरी, ते १५ ते २० किलो कमी भरताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष, वाढत आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, या संदर्भात आम्ही अनेकवेळा तक्रार केली आहे. पण, त्याची दखल कोणीच घेताना दिसत नाही. आमचा ऊस शेतांमध्ये पडून सुकू लागला आहे. या संदर्भात लाल यादव, तेजू यादव, प्रदीप, जयसिंह यादव यांनी याप्रकरणातील दोषी उच्चाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यावर जिल्हा ऊस अधिकारी साहब लाल यादव यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीचे लवकरात लवकर निराकरण केले जाईल, अशी ग्वाही दिली आहे. उसाचे वजन कमी भरत असल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
डाउनलोड करे चीनीमंडी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp