फिलिपाईन्समध्ये साखर उत्पादनात घसरण, आयातीवर भर

मनीला : फिलिपाईन्समध्ये कच्च्या साखरेचे उत्पादन सलग सहाव्या आठवड्यात घटले आहे. आणि एप्रिलच्या चौथ्या आठवड्यात ९.५ टक्केची घसरण यामध्ये झाली आहे. Sugar Regulatory Authority (SRA) कडील आकडेवारीनुसार, २४ एप्रिलपर्यंत कच्च्या साखरेचे उत्पादन १.६७ मिलियन मेट्रिक टनापर्यंत (MT) पोहोचले आहे. गेल्या वर्षी समान कालावधीत हे उत्पादन १.८५ मिलियन मेट्रिक टन होते. ही घसरण आधीच्या आठवड्यात नोंदवण्यात आलेल्या ७.९ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

एसआरएने यापूर्वी सांगितले होते की गेल्या वर्षीच्या अखेरीस आलेल्या ओडेट चक्री वादळाने ऊस पिक, गोदामांतील साखर साठाणि आणि प्रमुख ऊस उत्पादक जिल्ह्यातील साखर कारखाने, रिफायनरींतील सुविधा, उपकरणांचे नुकसान केले होते. कृषी विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि व्यवस्थापन संचालन केंद्राकडील आकडेवारीनुसार, ओडेट चक्रीवादळाने ऊसाची सुमारे P1.15 बिलियनची हानी झाली. एकूण कृषी क्षेत्रातील हानीच्या तुलनेत हे प्रमाण ८.६ टक्के इतके आहे. कमी साखर उत्पादन आणि वाढत्या किमती रोखण्यासाठी एसआरएकडून साखर आयातीवर भर दिला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here