बेंगळुरू : साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लवकरात लवकर थकीत पैसे देतील असे ऊस मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी सांगितेल. मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांना पैसे देण्यास उशीर करणाऱ्या साखर कारखान्यांच्या प्रशासनासोबत बैठक झाली. यानंतर ते म्हणाले, कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे १४३५.९४ कोटी रुपये थकीत आहेत. पाटील म्हणाले की, प्रलंबित बिले १५ एप्रिल रोजी २३८९.९४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. मात्र, एप्रिलच्या अखेरच्या १५ दिवसांत साखर आयुक्तांकडून थकबाकी देण्याबाबत साखर कारखान्यांना नोटीस जारी केल्यानंतर ९५४ कोटी रुपयांची बिले देण्यात आली आहेत.
शेतकऱ्यांना ऊस बिलांचे पैसे देण्याबाबत सरकार योग्य पावले उचलत असल्याचा दावा मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी केला. ते म्हणाले, शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे दिले जातील. सरकार इथेनॉल उत्पादन धोरण तयार करीत आहे. यासाठी तज्ज्ञांचे एक पथक इथेनॉल उत्पादनाचा अभ्यास करण्यासाठी उत्तर प्रदेशला गेले होते. कर्नाटक राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष कुरबुरू शांता कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आणखी एका टीमला ब्राझीलच्या अभ्यास दौऱ्यावर पाठवले जाईल. कर्नाटकमध्ये ३२ कारखाने इथेनॉलचे उत्पादन करीत आहेत. इतर ६८ कारखान्यांना इथेनॉल उत्पादनांसाठी तत्वतः मान्यता दे्यात आली आहे, असे मंत्री म्हणाले.