मुंबई : महाराष्ट्रात गुरुवारी विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्र वगळता इतर सर्व ठिकाणी लोकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून मुंबईपासून पुणे, आणि औरंगाबादसह ठिकठिकाणी हवामानात बदल झाला असून तापमान घटले आहे. दुसरीकडे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) विदर्भात १३ ते १५ मे या कालावधीत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यानंतर पश्चिमेकडील वाऱ्यांनी हवामानात बदल होईल. ढगाळ वातावरणामुळे उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो. याशिवाय महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत नोंदवण्यात आली आहे.
एबीपी लाईव्ह डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, मुंबईत गुरुवारी कमाल ३४ तर किमान २७ डिग्री सेल्सिअस तापमान राहील. हवामान साफ राहील. वायू गुणवत्ता सूचकांक समाधानकारक श्रेणीत नोंदला आहे. पुण्यात कमाल तापमान ३८ तर किमान तापमान २५ डिग्री सेल्सिअस राहील. हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत असेल. नागपूरमध्ये तापमान ४२ आणि २६ असे राहिल. तर येथे काहीसे ढगाळ वातावरण राहू शकेल. नाशिकमध्ये कमाल तापमान ४० तर किमान तापमान २४ डिग्री सेल्सिअस राहील. औरंगाबाद येथेही अशीच स्थिती राहील.