आगीत दीड एकरातील ऊस जळून खाक

मुजफ्फरनगर : शेतात उभ्या असलेल्या ऊस पिकाला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना छपारमधील दत्तीयाना गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात घडली. या प्रकारात जवळपास दीड एकरातील ऊस जळून खाक झाला.

याबाबत दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, छपार पोलीस ठाणे हद्दीतील दत्तीयाना गावातील शेतकरी राहुल तेजपाल सिंह यांच्या शेतातील ऊसाला अज्ञात व्यक्तीने आग लावली. ही आग काही वेळातच पूर्ण शेतभर पसरली. आगीच्या प्रकाराची माहिती मिळताच ग्रामस्थांची गर्दी झाली. ग्रामस्थांनी खूप प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत दीड एकरातील ऊस जळून खाक झाला. उसाला आग लावल्याची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी आले. पीडित शेतकऱ्याने या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here