इथेनॉल युनिट्सना कर्जाबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण करणार बिहारचा दौरा

पाटणा : केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण पुढील महिन्यात बिहारचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात त्या इथेनॉल युनिट्स स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करणाऱ्या गुंतवणूकदारांसमोर येणाऱ्या बँक कर्ज अडचणींबाबत राज्य सरकारच्या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करतील. सीतारमण यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्यासोबत इथेनॉल युनिट्सच्या कर्जाविषयी चर्चा केली आहे.

द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मंत्री प्रसाद यांनी सीतारमण यांना विनंती केली की, ३० ते ५० किलो लिटर प्रतीदिन उत्पादन क्षमतेच्या इथेनॉल प्लांटमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना बँकांकडून कर्ज मिळवताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रसाद यांनी सीतारमण यांना सांगितले की, ही एक गंभीर समस्या आहे. राज्याने देशात इथेनॉल हबच्या रुपात विकसित होण्याचे प्रयत्न चालवले आहेत. यासाठी या समस्येवर तोडगा काढण्याची गरज आहे. ते म्हणाले की, इथेनॉल उत्पादनाचा कोटा वाढवून प्रती दिन ६५ किलो लिटर करण्यात यावा. प्रसाद यांनी त्यांना राज्याचा दौरा करण्याचीही विनंती केली. त्यास सीतारमण यांनी सहमती दर्शवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here