शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज : कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर

भुवनेश्वर : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटीबद्ध आहे. आणि सरकार देशातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊनच प्रत्येक पाऊल उचलले आहे असे प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्र सरकारने उचललेल्या पावलांचा लाभ त्यांना आधीच मिळायला सुरुवात झाली आहे, असे ते म्हणाले. मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना उत्पादकता वाढविण्यासाठी आणि अधिक चांगला लाभ मिळविण्यासाठी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरावे असे आवाहन केले.

एका शेतकरी परिषदेत कृषी मंत्री तोमर बोलत होते. ते म्हणाले, ओडिशामध्ये शेतकऱ्यांना आपले उत्पन्न वाढविण्यासाठी खूप संधी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कटिबद्ध आहे. ते म्हणाले की, शेतकऱ्यांना याचा लाभ तातडीने दिसून येत नाही. कारण, त्याचे परिणाम दिसायला वेळ लागतो. केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षात अनेक योजना लागू केल्या आहेत. आणि त्यांचा लाभ मिळविण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. ओडिसामध्ये २४,००० हेक्टर जमीन जैविक शेतीसाठी तयार आहे. याचा फायदा आगामी काळात दिसून येईल असे तोमर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here