नवी दिल्ली : यंदा मान्सून लवकरच येणार आहे. भारतासारख्या देशाला याशिवाय मोठ्या आनंदाची बातमी असू शकत नाही. कारण, इथे मान्सून म्हणजे समृद्धी असा अर्थ घेतला जातो. चांगला पाऊस ज्यावेळी होतो, तेव्हा देशातील गरीबीमध्ये घसरण होते. व्यवसायात वृद्धी दिसून येते. मान्सून सर्वांसाठी फायदेशीर असतो. भारतात विहिर अथवा कुपनलिकेतून कितीही पाणी शेतीला द्या, पिकामध्ये ताकद मान्सूनच्या पावसानेच येते. त्यामुळे शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यांपर्यंत आणि सर्वसामान्य माणसांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वांचे लक्ष हवामान विभागाच्या अंदाजाकडे लागलेले असते.
याबाबत टीव्ही९हिंदी डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) जाहीर केलेल्या अनुमानानुसार यंदा मान्सून वेळेपूर्वीच दाखल होणार आहे. देशाच्या दक्षिण किनारपट्टीवर, केरळमध्ये तो २७ मे रोजी दाखल होईल. नियमीत तारखेच्या पाच दिवस आधी मान्सून येत आहे. सामान्य मान्सूनचे अनुमान असल्यामुळे चांगले पिक येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे महागाईपासून दिलासा मिळू शकतो. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, यावेळी दक्षिण पश्चिम मान्सून आपल्या नियमीत वेळेआधी केरळमध्ये दाखल आहे.
मान्सूनचा फायदा देशाला होत असला तरी वेळेपूर्वी पाऊस सुरू झाला तर त्याचा फायदा पिकांच्या बंपर उत्पादनाला होतो अशी काही राज्ये आहेत. यामध्ये तांदूळ, मक्का, ऊस, कापूस, सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. भात शेती बंगाल, पंजाब, यूपी, उत्तरांचल, आंध्र प्रदेश, तामीळनाडू, बिहार, आसाम, ओडिसामध्ये सर्वाधिक केली जाते. मान्सूनचा या राज्यांना अधिक फायदा होईल. तसेच मक्का उत्पादन क्षेत्रापैकी आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेशला लाभ होईल. आंध्रमध्ये एकूण उत्पादनाच्या २१ टक्के मक्का उत्पादन होतेल. ऊस पिकवणाऱ्या राज्यांनाही पावसाचा चांगला पाऊस होईल. यात महाराष्ट्र, कर्नाटक, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात, बिहार, हरियाणा आणि पंजाबचा समावेश आहे.