वाढत्या महागाईत सुद्धा पेट्रोल, डिझेलच्या खपात वाढ

नवी दिल्ली : किमतीमध्ये प्रचंड वाढ होऊनसुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. याबाबत एएआयने वृत्त दिले आहे. ANI शी बोलताना सरकारी सूत्रांनी सांगितले की, गेल्या महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात पेट्रोलच्या खपात १४ टक्के वाढ झाली आहे. तर याच कालावधीत डिझेलच्या खपात २ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. पेट्रोलियम उत्पादकांना वाढत्या किमतीबाबत सूत्रांनी सांगितले की, जागतिक स्थिती नियंत्रणात येताच पेट्रोल, डिझेलचे दर कमी होतील. २२ मार्च ते ६ एप्रिल यांदरम्यान, पेट्रोल, डिझेलच्या दरात १४ वेळा वाढ झाली. दिल्लीत पेट्रोलचा दर १०५.४१ रुपये प्रती लिटर आहे. तर डिझेल ९६.६७ रुपये प्रती दराने विक्री केले जात आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत गेल्या वेळी ६ एप्रिल रोजी ८० पैसे प्रती लिटर वाढ करण्यात आली होती. सूत्रांनी सांगितले की, भारताने जैव इंधन मिश्रण योजनेला गती दिली आहे. १ एप्रिल २०२३ पर्यंत देशातील सर्व पेट्रोल पंपांवर २० टक्के मिश्र इंधन उपलब्ध असेल. ग्रीन हायड्रोजन बाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, भारताने ग्रीन हायड्रोजनमध्ये अभूतपूर्व प्रगती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३० पर्यंत ५ मिलियन टन प्रती वर्ष उत्पादनाचे उद्दीष्ट निश्चित करुन ग्रीन हायड्रोजन धोरणाची घोषणा केली आहे. ग्रीन हायड्रोजन एक स्वच्छ इंधन आहे. पाण्यातील हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या विभाजनातून त्याचे उत्पादन होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here