कझाकिस्तानमध्ये साखरेची देशांतर्गत मागणीच्या तुलनेत पुरेसा साठा उपलब्ध

नूर सुल्तान : कझाकिस्तानमध्ये नजीकच्या काळात साखरेच्या दरामध्ये कोणतीही वाढ होण्याची शक्यता नाही, असे कृषी मंत्री येरबोल करशुकेयेव यांनी सांगितले. कृषी मंत्र्यांच्या या विधानानंतर महागाईने त्रस्त लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंत्री करशुकेयेव म्हणाले की, जागतिक स्तरावर साखरेच्या दरात वाढ होत असताना कझाकिस्तानमध्ये साखरेचे दर KZT400-500 प्रती किलोवर स्थिर आहेत. ते म्हणाले की, मे महिन्यात देशात ३२,०००-३५,००० टन साखर उत्पादन होईल. तरी जूनमध्ये जास्त साखरचे उत्पादन होईल.

करशुकेव यांच्या म्हणण्यानुसार, हे उत्पादन साखरेची देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहे आणि नजीकच्या काळात साखरेच्या दरात कोणतीही वाढ होण्याची शक्यता नाही. यापूर्वी कझाकिस्तानमध्ये २३ मेपासून साखर निर्यातीवर ६ महिन्यांसाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here