महाराष्ट्र : पूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरू राहणार

पुणे : सध्याच्या हंगामात ऊसाचे उच्चांकी उत्पादन झाले आहे. मात्र, आताही हे उच्चांकी उत्पादन सरकार, साखर कारखाने आणि शेतकऱ्यांसाठी आव्हान बनुन समोर उभे राहिले आहे. राज्यात सध्या १५ लाख टनाहून अधिक ऊस शेतातच आहे. खास करून मराठवाडा विभागात ही गंभीर समस्या बनली आहे. पश्चिम महाराष्ट्रात जवळपास हंगाम समाप्त झाला आहे. मात्र, मराठवाडा विभागात ३० हून अधिक कारखाने शंभर टक्के ऊस गाळप होईपर्यंत सुरू राहतील. महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांत यंदा अतिरिक्त ऊस उत्पादनात अग्रेसर आहेत, त्यामध्ये सात मराठवाड्यातील आहेत.

प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर आणि मराठवाड्यातील जालना जिल्ह्याच्या काही भागात जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गाळप सुरू होईल. ऊस तोडणी गतीने व्हावी यासाठी आतापर्यंत दुसऱ्या राज्यांतून १२९ हार्वेस्टर आणण्यात आले आहेत. यामध्ये फक्त जालना जिल्ह्यात २९ हार्वेस्टर कार्यरत आहेत.

राज्यात २०२०-२१ मध्ये ११.४२ लाख हेक्टरमध्ये ऊसाची लागण झाली होती. मात्र, यावर्षी, २०२१-२२ मध्ये हा आकडा २.२५ लाख हेक्टरने वाढून १३.६७ लाख हेक्टरपर्यंत पोहोचला. गेल्या वर्षी ऊस गाळप १०१३.३१ लाख टन होता. तर यावर्षी १६ मेपर्यंत २८७.३१ लाख टन वाढून १३००.६२ लाख टन ऊस गाळप झाले आहे. १५ मे पर्यंत राज्यात एकूण १९९ साखर कारखान्यांपैकी १२६ कारखान्यांनी आपले गाळप बंद केले आहे. २५ मेपर्यंत हा आकडा १६३ पर्यंत पोहोचू शकतो. उर्वरीत ३६ कारखाने ऊस संपेपपर्यंत सुरू राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here