पंजाब : थकबाकीप्रश्नी ऊस उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या तयारीत

फगवाडा : साखर कारखान्यांकडे थकीत असलेली कोट्यवधी रुपयांची ऊस बिले त्वरीत मिळावीत यासाठी राज्य सरकारवर नाराज असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले जाणार आहे. शेतकरी २६ मे पासून आपले आंदोलन तीव्र करणार असल्याचे वृत्त प्रसार माध्यमांनी दिले आहे.

द ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भारतीय किसान युनियनचे (दोआबा) महासचिव सतनाम सिंह साहनी यांनी सांगितले की, विविध १६ संघटनांचे सदस्य असलेले शेतकरी फगवाडा येथे धरणे आंदोलन सुरू करतील. रस्त्यांवर होणाऱ्या या आंदोलनातून वाहतूक रोखली जाईल. साखर कारखान्यांचे व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनाने वारंवार आश्वासने दिली आहेत. मात्र, थकीत ऊस बिले देण्याकडे त्यांनी डोळेझाक केली आहे, असे साहनी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here