गोवा : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला नुकसान भरपाईचा पहिला हप्ता

फोंडा : गोवा सरकारकडून ७०० हून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांपैकी २२३ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या पहिल्या हप्त्याच्या स्वरुपात २.०८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. २०१९ मध्ये संजीवनी साखर कारखाना बंद झाल्यानंतर, राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून आगामी पाच वर्षे विशेष सहाय्य केले जाईल अशी घोषणा केली होती.

द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, २२३ शेतकऱ्यांपैकी १०६ शेतकरी सांगेमधील, ५० शेतकरी काणकोणमधील तर ४० केपे आणि २७ शेतकरी सत्तरीमधील आहेत. कारखान्याचे प्रशासक चिंतामणी पेर्णी यांनी सांगितले की, सरकारने नुकसान भरपाई देण्यासाठी ७.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ज्या शेतकऱ्यांनी घोषणापत्र दिले आहे, त्यांनाच ही नुकसान भरपाई मिळणार आहे. कारखाना बंद झाल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here