जिल्ह्यात ऊसाचे गाळप वाढले, मात्र साखर उतारा घटला

सहारनपुर : जिल्ह्यातील सहापैकी चार साखर कारखान्यांनी यंदाचा गळीत हंगाम संपवला आहे. तरी देवबंद आणि सरसावा हे साखर कारखाने अजून ऊस गाळप करत आहेत. साखर कारखान्यांनी गेल्यावर्षीच्या तुलनेत २० लाख क्विंटल अधिक ऊस गाळप करून ५३.३८ लाख क्विंटल साखर तयार केली आहे. मात्र, यंदा साखरेचा सरासरी उतारा गेल्या हंगामाच्या तुलनेत ०.२६ टक्क्यांनी कमी झाला आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांना यावर्षी भरपूर ऊस उपलब्ध झाला. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा जास्त ऊस गाळप झाले. गेल्यावर्षी पूर्ण हंगामात साखर कारखान्यांनी ५००.३९ लाख क्विंटल ऊस गाळप केले होते. तरी चालू हंगामात आतापर्यंत ५२०.२३ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. देवबंद आणि सरसावा हे कारखाने अजून ऊस गाळप करत आहेत. यावर्षी जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र १.१५ लाख हेक्टर होते. यंदा साखरेचा सरासरी उतारा गेल्या हंगामाच्या तुलनेत ०.२६ टक्क्यांनी कमी आहे. याचे कारण जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांकडून बी हेवी मोलॅसिस तयार केल्याचे मानले जाते. बी हेवी मोलॅसिसमध्ये सामान्य मोलॅसिसच्या तुलनेत अधिक साखर सोडली जाते. ज्यामुळे उतार्‍यात घट होते.जिल्ह्यात आतापर्यंत ५३.३८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जे गेल्यावर्षीच्या तुलनेत ७२,००० क्विंटल अधिक आहे. देवबंद आणि सरसावा कारखान्यांचा गळीत हंगाम संपल्यानंतर साखर उत्पादनाची नेमकी स्थिती स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here