मुंबई : महाराष्ट्राला आता उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. सोमवारपासून राज्यात पूर्वमोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मुंबईसह राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यात अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधुनमधून पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मान्सून किमान ४ ते ५ दिवस आधी येऊ शकतो असे हवामान विभागाने सांगितले. दुसरीकडे राज्यात हवेचा गुणवत्ता सुचकांक बहुतांश शहरात चांगला ते मध्यम या श्रेणीमध्ये आहे. या आठवड्यात हा सूचकांक असाच राहील.
एबीपी लाइव्ह डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, मुंबईत गुरुवारी कमाल ३५ तर किमान २८ डिग्री सेल्सिअस तापमान राहील. आठवडाभर हवामान ढगाळ राहील. वायू गुणवत्ता सूचकांक समाधानकारक श्रेणीत नोंदला आहे. पावसाची शक्यता आहे. पुण्यात कमाल तापमान ३६ तर किमान तापमान २४ डिग्री सेल्सिअस राहील. पावसाची शक्यता आहे. हवेची गुणवत्ता समाधानकारक श्रेणीत असेल. आठवडाभर वातावरण ढगाळ राहील. हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत आहे. नागपूरमध्ये तापमान ४३ आणि २७ असे राहिल. पावसाची शक्यता आहे. येथे आठवडाभर काहीसे ढगाळ वातावरण राहू शकेल. हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान ३६ तर किमान तापमान २३ डिग्री सेल्सिअस राहील. हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत आहे. औरंगाबाद येथे ढगाळ वातावरण राहील. येथे कमाल तापमान ३९ तर किमान तापमान २५ डिग्री सेल्सिअस राहील. हवेची गुणवत्ता चांगल्या श्रेणीत नोंदवली आहे. आठवडाभर काहीसे ढगाळ वातावरण राहील. पावसाचीही शक्यता आहे.