बिजनौर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऊसाच्या उत्पादनात सलग तिसऱ्या वर्षी उच्चांकी उत्पादन केले आहे. साखर कारखान्यांनी आतापर्यंत साडेअकरा कोटी क्विंटलहून अधिक ऊस गाळप करीत आहे. आताही दोन साखर कारखाने गाळप करीत आहेत. साखर कारखान्यांनी केलेल्या सर्व्हेत उसाचे क्षेत्र चार टक्के वाढले आहे. त्यामुळे पुढील हंगामात उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. ऊस गाळपात गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील साखर कारखाने अव्वल क्रमांकावर आहेत.
दैनिक जागरणमधील वृत्तानुसार, जिल्ह्यात सुमारे अडीच लाख हेक्टर जमिनीत ऊस उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात ७० टक्के जमिनीवर ऊस आहे. जिल्ह्यातील शेतकरी सलग तीन वर्षांपासून ऊस उत्पादनात उच्चांक प्रस्थापित करीत आहेत. २०१९-२० च्या गळीत हंगामात पहिल्यांदाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ११.४२ कोटी क्विंटल ऊस उत्पादन घेतले होते. गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांना ११.४६ कोटी क्विंटल ऊस विक्री केला. यावर्षी आतापर्यंत शेतकऱ्यांनी कारखान्यांना ११.५२ कोटी क्विंटल ऊस विक्री केला आहे. स्योहारा कारखान्याचे गाळप मंगळवारपर्यंत संपुष्टात येईल. तर धामपूर साखर कारखाना आणखी एक ते दोन दिवस गाळप करेल. बिजनौर कारखान्याने ११५४.७० लाख क्विंटल ऊस गाळप केला आहे. जिल्ह्यातील कारखाने ऊस गाळपात अग्रेसर असल्याचे जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले.