अन्न मंत्रालयाकडून उसाची एफआरपी वाढविण्याबाबत कॅबिनेट नोट जारी : मीडिया रिपोर्ट्स

अनेक प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न मंत्रालयाने ऊसाची FRP (ऊस दर) वाढविण्याबाबत कॅबिनेट नोट जारी केली आहे.

Zee Business ने दिलेल्या वृत्तानुसार FRP 15 रुपये प्रती क्विंटल वाढविण्याबाबत कॅबिनेट नोट जारी केली आहे. २०२१-२२ या हंगामासाठी ऊसाची एफआरपी २९० रुपये प्रती क्विंटल होती.

केंद्र सरकारने २५ ऑगस्ट रोजी गळीत हंगामासाठी एफआरपी ५ रुपयांनी वाढवून २९० रुपये प्रती क्विंटल करण्याचा निर्णय घेतला होता.

जर सरकारने ऊस दरात वाढ केली तर साखर कारखान्यांवर याचा आर्थिक परिणाम निश्चितच दिसू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here