महाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम लवकरच संपुष्टात येईल. आणि या हंगामात राज्यात उच्चांकी साखर उत्पादन करण्यात आले आहे.
साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, २ मे २०२२ अखेर महाराष्ट्रात १३६.९९ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. साखर उतारा १०.४० टक्के इतका आहे. सध्या राज्यातील २०० पैकी १७४ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम समाप्त केला आहे.
ऊस बिले देण्याबाबतही राज्याने चांगली कामगिरी केली आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी १५ मेअखेर ३६,३८०.१३ कोटी रुपयांची एफआरपी दिली आहे. राज्यातील एकूण एफआरपीच्या तुलनेत ही आकडेवारी ९६ टक्के आहे. ऊस बिले देण्यात राज्याने देशात अव्वल क्रमांक राखला आहे.