बिजनोर : अधिक उत्पादनासाठी शेतकरी रासायनिक किटनाशकांचा जादा वापर करीत आहेत. त्यामुळे माणसे आणि शेतीचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे ऊस विभागाने शेतकऱ्यांना रासायनिक ऐवजी सेंद्रीय किटकनाशकांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस उत्पादनाचा खर्च कमी होत असून शेतीचे आरोग्यही चांगले राहील. शेतकऱ्यांचा चांगले उत्पन्न मिळत आहे. ऊस हेच बिजनौर जिल्ह्याच मुख्य पिक आहे. जवळपास सव्वा दोन लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस पिक घेतले जाते. आता ऊस विभाग शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास प्रयत्न चालू केले आहेत. त्यासाठी जैविक उत्पादनांतून ऊस शेतीच्या प्रयोगांवर भर दिला जात आहे.
याबाबत अमर उजालामधील वृत्तानुसार, उसाचा सध्या सर्व्हे करणारे कर्मचारी शेतकऱ्यांना सेंद्रीय खते, किटकनाशकांचा वापर ऊस शेतीत करण्याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. याबाबत जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले की, जैविक उत्पादनामुळे शेतीचे आरोग्य चांगले पाहिल. खर्चात बचत होईल. शेतकऱ्यांनी ट्रायकोडर्मा, वाबेरिया बैसियाना तथा ट्रायकोकार्ड आदी जैविक कीटकनाशकांचा वापर करावा. याबाबत राज्याच्या साखर उद्योग तथा ऊस विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनीही जैविक उत्पादनांचा प्रसार वाढविण्याच्या सूचना ऊस संशोधन केंद्रांचे संशोधक, जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. कार्यशाळांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.