थायलंडमध्ये साखरेच्या दरात वाढ करण्याची Mitr Phol ने केली मागणी

बँकॉक : ब्राझीलनंतरचा साखरेचा सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या भारताने निर्यात रोखण्याचा निर्णय घेतल्याने जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किमती वाढल्या आहेत, असे थायलंडचा सर्वात मोठा साखर उत्पादक असलेल्या Mitr Phol समुहाचे अध्यक्ष बांटोएंग वोंगकुसोलकिट यांनी सांगितले. मात्र, याचा थाई पुरवठा आणि निर्यातीवर परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की देशांतर्गत वापरासाठी आणि नियमित निर्यातीसाठी अद्याप उत्पादन पुरेसे आहे. तथापि, सर्वाधिक चिंतेचा मुद्दा म्हणजे ऊस लागवड आणि साखर उत्पादनाचा वाढता खर्च याचा आहे.

वोंगकुसोलकिट म्हणाले की, डिझेल ईंधन आणि खते हेही चिंतेचे मुख्य कारण आहे. कारण या दोन्हीच्या किमती गेल्या पिक हंगामाच्या तुलनेत ४० टक्के वाढल्या आहेत. वाढत्या उत्पादन खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी सरकारने साखरेची किंमत वाढविण्याची गरज आहे. त्यांनी सरकारकडे जागतिक साखरेच्या किमती घसरण्यापूर्वी साखरेच्या किमती वाढवाव्यात, या मागणीवर तत्काळ विचार करावा असा आग्रह केला.

बंटोएंग यांनी सांगितले की, आमची कंपनी आणि ऊस उत्पादक शेतकरी संघाने आधीच अनेक वेळा ऊस आणि शुगर बोर्डाच्या कार्यालयाकडे आमच्या मागण्या मांडल्या आहेत. कारण, ते सरकारकडे हा मुद्दा मांडू शकतात. आम्हाला अपेक्षा आहे की, ते लवकरात लवकर योग्य किमतीबाबत आमच्याशी चर्चा करतील, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here