डब्ल्यूटीओमध्ये निष्पःक्ष, संतुलित परिणामांसाठी जी – ३३ सदस्यांनी एकत्र काम करावे : पियूष गोयल

जिनेव्हा : भारताने जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) बैठकीत निष्पक्ष, संतुलित आणि विकास केंद्रीत निष्कर्ष मिळविण्यासाठी विकसनशील देशांतील जी ३३ समुहाने एकत्र काम करावे. समान विचारधारेच्या लोकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन भारताने केले. सार्वजनिक साठवणूक. विशेष सुरक्षेच्या उपाययोजनेवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यावर भारताने भर दिला. डब्ल्यूटीओच्या मंत्रीस्तरीय संमेलनात वाणिज्य तथा उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले की, जी- ३३ विकसित देशांकडून आपल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानामुळे किमतीमधील घसरण आणि आयात
वाढविण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विकासशील देशांना या प्रवृत्तीच्या दुःष्परिणामांबाबत सुरक्षेचे उपाय करण्यास खास संरक्षण व्यवस्था (एसएसएम) तयार करण्याचे आवाहन केले.

पंजाब केसरीमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गोयल म्ह्णाले की, आम्ही सर्वांनी या समुहाची एकता टिकवून ठेवण्यासाठी सामुहिकरित्या काम करण्याची गरज आहे. समान विचारधारेच्या देशांपर्यंत पोहोचून निष्पक्ष, संतुलित आणि विकास-केंद्रित परिणामांसाठी आपण त्यांना पाठबळ दिले पाहिजे. गोयल यांनी बाराव्या मंत्रीस्तरीय परिषदेत जी -३३ मंत्रिस्तरीय बैठकीत सांगितले की, भारताने विकासशील देशांशी एकत्र काम करण्याचे धोरण ठेवले आहे. भारताने एसएसएमवर अधिक भर दिला आहे. याचा उद्देश गरीब आणि सीमेवरील शेतकऱ्यांना आयात दरातील घसरणीचा फटका बसू देऊ नये असे त्यांनी
सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here