क्युबामध्ये साखर उद्योग संकटात

हवाना : देशाच्या इतिहासात चालू गळीत हंगामात सर्वाधिक खराब पिक उत्पादनामुळे साखर निर्यातीच्या आपल्या आंतरराष्ट्रीय करारांची पूर्तता केली जावू शकत नाही अशी घोषणा अज़्कुबा साखर समुहाने केली आहे. क्यूबामधील या स्थितीचा सर्वाधिक फटका चीनला बसणार आहे. अज़्कुबाचे संप्रेषण संचालक डायोनिस पेरेज़ यांनी सांगितले की, साखरेचे उत्पादन देशांतर्गत बाजारपेठेसाठी पुरेसे ठरणार आहे.

डिसेंबरमध्ये नॅशनल असेंब्लीसमोर सादर झालेल्या योजनेनुसार, उत्पादन ९,११,००० टनापर्यंत पोहोचेल असे अनुमान व्यक्त करण्यात आले होते. देशांतर्गत खप ५,००,००० टन राखीव ठेवून उर्वरीत ४,११,००० टन निर्यात करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. अधिकृत आकडेवारीनुसार, क्युबाच्या साखर निर्यातीसाठी चीन ही मुख्य बाजारपेठ आहे. चीन दरवर्षी ४,००,००० टन साखर क्यूबाकडून खरेदी करतो.

पेरेज़ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ईंधन आणि खतांची कमतरता, साखर कारखान्यांची खराब स्थिती यामुळे ऊस क्षेत्र संकटात आहे. २० मे रोजी समाप्त झालेल्या हंगामात सहभागी झालेल्या ३५ कारखान्यांपैकी फक्त तीन कारखान्यांच्या उद्दिष्टांची पूर्तता झाली आहे. क्युबाचा साखर उद्योग अनेक वर्षांपासून संकटातून जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here